*​कवठेकर प्रशालेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी*

StarMaharashtrasanchar 0

 

​पंढरपूर:

कवठेकर प्रशाला, नाथ चौक, पंढरपूर येथे आज दि. १ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

​या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. वाय. पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. एन. जी. कुलकर्णी सर व प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षकांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. वाय. पाटील सर यांनी केले. यामध्ये त्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या बद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली.या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्यावर आधारित भाषण केले.

​१ ऑगस्ट हा 'लेखन-प्रेरणा दिन' म्हणून साजरा केला जातो. त्याअनुषंगाने प्रशालेत उत्कृष्ट फलक लेखन करणारे श्री. देवमारे सर, सौ. दळवी मॅडम, सौ. वसावे मॅडम व सौ. महाडिक मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.

​या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. एन. जी. कुलकर्णी सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वसावे मॅडम यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री. राजुरकर सर व सौ. वळवी मॅडम यांनी केले.

​

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

राज्य प्रवाह न्यूज पोर्टल मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची किवा व्यक्तीची असून राज्य प्रवाह न्यूज चे संपादक / अथवा मालक हे त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.राज्य प्रवाह न्यूज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता राज्य प्रवाह न्यूज तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार राज्य प्रवाह न्यूज नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे.