*कवठेकर प्रशालेत यशाचा जल्लोष आणि रोटरी क्लब पुणे यांच्या योगदानातून साकार आधुनिकतेच्या सोयी सुविधांचे जोशात उदघाटन*

StarMaharashtrasanchar 0

 ​ *कवठेकर प्रशालेत यशाचा जल्लोष आणि रोटरी क्लब पुणे यांच्या योगदानातून साकार आधुनिकतेच्या सोयी सुविधांचे जोशात उद्घाटन* 


.       पंढरपूर एज्युकेशन सोसायटी पंढरपूर संचलित कवठेकर प्रशाला,नाथ चौक येथे एक अविस्मरणीय ऐतिहासिक सोहळा पार पडला. निमित्त होते, रोटरी क्लब पुणे यांच्या सीएसआर (CSR) फंडातून मिळालेल्या अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण आणि १० वीच्या परीक्षेत यशाचे शिखर पादाक्रांत  करणाऱ्या २५ रणधुरंदरांचा पालकांसह झालेला शाही गौरव. संपूर्ण कार्यक्रम एवढ्या प्रचंड उत्साहात आणि जोशात पार पडला की, प्रशालेचा परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने आणि फटाक्यांच्या आवाजाने दुमदुमून गेला होता.

​कार्यक्रमाचा प्रारंभ संस्थेचे सचिव श्री.सु. र.पटवर्धन यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी प्रास्ताविकाने झाला. आपल्या भाषणामध्ये त्यांनी रोटरी क्लब ने दिलेल्या विविध विद्यार्थ्यांप्रती सोयीसुविधांचा अत्यंत कृतज्ञता पूर्ण उल्लेख केला व या सोयीमुळे कवठेकर प्रशाला चे विद्यार्थी नक्कीच त्यांच्या भावी आयुष्यामध्ये शैक्षणिक प्रगती मध्ये फार मोठी शिखरे सर करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.रोटरी क्लब पुणे व पंढरपूर एज्युकेशन सोसायटी यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा साधणारे पुणे रोटरीचे प्रांतपाल श्री धनंजय राजुरकर व प्रशालेतील त्यांचे ज्येष्ठ बंधू  शिक्षक श्री चंद्रशेखर राजुरकर यांच्या  अथक प्रयत्नांमुळे  या कार्यास मूर्त स्वरूप मिळाले.ज्येष्ठ रोटरीयन श्री अमेय धोत्रे यांनी आपल्या अत्यंत मार्मिक भाषणामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांप्रती रोटरी क्लबची असलेली आपुलकी व जिव्हाळा  याचा विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन केले व भविष्यामध्ये याहीपेक्षा जास्त योगदान आपण या प्रशालेसाठी देऊ असे आश्वासन दिले.

त्यानंतर रोटरी क्लब पुणे व पाषाण यांचे सर्व पदाधिकारी 

श्री अमेय धोत्रे 

सौ प्राजक्ता जेरे (प्रांतपाल पुणे रोटरी क्लब, पुणे )

श्री हेमंत जेरे

श्री मिलिंद ग्रामोपाध्ये 

श्री सतीश सातारकर 

श्री सचिन अमडेकर 

श्री विवेक रत्नाळीकर व 

सौ दीपा पानसे 

यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन यथोचित सत्कार संस्थेचे अध्यक्ष 

श्री नानामालक कवठेकर, 

 सचिव श्री सु.र. पटवर्धन  संस्था सदस्य डॉ. श्री मिलिंद जोशी व 

श्री एस पी कुलकर्णी सर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे व पाषाण यांच्या दातृत्वातून साकारलेल्या तब्बल ९ लाख रुपयांच्या अत्याधुनिक व नूतनीकरण केलेल्या प्रयोगशाळेचे शानदार उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर रोटरी क्लब पुणे पाषाण यांनी प्रशालेला 

​वैज्ञानिक प्रगतीला निसर्गाची जोड देत  सोलार प्लांट आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी वॉटर सॉफ्टनर विद्यार्थ्यांसाठी भेट दिला होता त्याचे हे उद्घाटन सर्व मान्यवर व संस्था पदाधिकाऱ्यांचे हस्ते  करण्यात आले.या नव्या सुविधांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पंखांना आता आधुनिक विज्ञानाची नवे बळ मिळणार आहेत.

.       ​या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी व्यासपीठावर पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. नाना मालक कवठेकर, सचिव श्री.सु. र.पटवर्धन, संस्था सदस्य डॉ. श्री. मिलिंद जोशी, श्री. एस. पी. कुलकर्णी आणि रोटरी क्लब पुणे व पाषाणचे सर्व खंदे शिलेदार व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

​        त्याचबरोबर नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेमध्ये प्रशालेतून  यश मिळवलेल्या सुमारे राज्यात प्रथम आलेल्या दोन विद्यार्थ्यांचे व 90% पेक्षा जास्त  सर्व मिळवलेल्या  25 विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांसमवेत   उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक शाही फेटा, सन्मानाची शाल आणि देखणे स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.उपस्थित सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचा हा आनंद सोहळा आपल्या डोळ्यात भावुक होऊन साठवून ठेवला. 

​      कार्यक्रमाची सांगता प्रशालेचे मुख्याध्यापक  श्री व्ही वाय पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. त्यांनी आपल्या आभार प्रदर्शनामध्ये  रोटरी क्लबतर्फे प्रशालेस मिळालेल्या सर्व सोयीसुविधांचा योग्य आणि परिणामकारक उपयोग करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणार असल्याचे  मान्यवरांना आश्वासन देऊन सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होऊन  कार्यक्रम अत्यंत आनंदात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नरेंद्र भंडारकवठेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

राज्य प्रवाह न्यूज पोर्टल मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची किवा व्यक्तीची असून राज्य प्रवाह न्यूज चे संपादक / अथवा मालक हे त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.राज्य प्रवाह न्यूज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता राज्य प्रवाह न्यूज तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार राज्य प्रवाह न्यूज नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे.