आता टोलनाके बंद होणार. नितीन गडकरींची मोठी घोषणा. संसदेत म्हणाले.

StarMaharashtrasanchar 0


नागपूरसह देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास केल्यास आता विशिष्ट किलोमिटरनंतर अनेक भागात पथ कर नाके (टोल नाके) लागतात. येथे कराची रक्कम भरल्याशिवाय चारचाकी वा जड वाहन पुढे नेता येत नाही.

या पथकराबाबत मोठी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत केली आहे. समाज माध्यमावर फिरणाऱ्या एका 'व्हिडोओ'मध्ये नितीन गडकरी काय म्हणाले? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.

सध्याच्या प्रचलीत पद्धतीनुसार राष्ट्रीय महामार्गावर चारचाकी वाहनाने प्रवास करतांना एखादा टोल नाका लागल्यास वाहन धारकाला वाहन तेथे थांबवावे लागले. येथे टोल नाक्यावरील कर्मचारी विशिष्ट कॅमेराच्या मदतीने अथवा स्कॅनरद्वारा संबंधिताच्या वाहनातील फास्ट टॅग स्कॅन करतात. त्यानंतर टोल नाक्याचा कर त्याच्या खात्यातून कपात केला जातो. त्यानंतर हे वाहन पुढे नेता येते. परंतु या पद्धतीत मोठा बदल करण्याची घोषणा नितीन गडकरीचा समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या संसदेतील व्हायरल व्हिडिओत दिसत आहे. त्यात नितीन गडकरी म्हणाले, आता देशभरातील टोल नाके बंद होणार आहे.


नवीन पद्धतीत सदर वाहने महामार्गाने जात असतांना त्याच्या वाहन क्रमांक पाटीचे छायाचित्र काढले जाईल. त्यानंतर हे वाहन निश्चित ठिकाणी गेल्यावर वाहन धारकाच्या खात्यातून टोलची रक्कम कपात केली जाईल. या पद्धतीत आता रस्त्यावर पथ नाके व तेथे कर्मचारी असा प्रकार दिसणार नाही. सध्या सुमारे १० ठिकाणी हे काम दिले गेले आहे. येत्या वर्षभरात सगळ्याच ठिकाणी ही नवीन पद्धत सुरू होणार असल्याचेही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे नवीन पद्धतीनुसार टोल वाहन चालकांच्या थेट खात्यातून कसे कपात होईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

राज्य प्रवाह न्यूज पोर्टल मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची किवा व्यक्तीची असून राज्य प्रवाह न्यूज चे संपादक / अथवा मालक हे त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.राज्य प्रवाह न्यूज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता राज्य प्रवाह न्यूज तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार राज्य प्रवाह न्यूज नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे.