मारुती इको गाडी उलटून भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी रत्नागिरीतील भोगाव पुलावर भरधाव इको कार उलटून अपघात.

StarMaharashtrasanchar 0

 मारुती इको गाडी उलटून भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी

रत्नागिरीतील भोगाव पुलावर भरधाव इको कार उलटून अपघात


रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील भोगाव पुलावर गुरुवार, ११ सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या मारुती इको गाडी उलटून भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली इको कार संरक्षक भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लिंगप्पा कट्टप्पा पातारे (वय २९, रा. आदर्शनगर कॉलनी नं. २, दिघी, पुणे) हा आपल्या ताब्यातील इको कार (एमएच-१४ केएस-०२३१) घेऊन मुंबई ते गोव्याच्या दिशेने जात होता. मात्र, भोगाव पुलावर पोहोचताच त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट डाव्या बाजूच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात अनिल देविदास कांबळे (वय ५५) रा. घरवली, ता. हवेली, जि. पुणे यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालक लिंगप्पा पातारे, नागेश मलके कांबळे (वय ३७) रा. चरवली, ता. हवेली, जि. पुणे आणि विकास शंकर चव्हाण (वय १८) रा. चरवली, ता. हवेली, जि. पुणे हे तिघे जखमी झाले आहेत.


अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभाग, कशेडी यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. मृतदेह व जखमींना रुग्णवाहीकेतून कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

About Us

राज्य प्रवाह न्यूज पोर्टल मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची किवा व्यक्तीची असून राज्य प्रवाह न्यूज चे संपादक / अथवा मालक हे त्या मतांशी सहमत असतीलच असे नाही.राज्य प्रवाह न्यूज मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता राज्य प्रवाह न्यूज तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार राज्य प्रवाह न्यूज नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे.